सीबीआय प्रकरणामुळे दिग्गज वकील आमने-सामने

0

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीबीआयमध्ये सध्या भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणावरून वाद सुरु आहे. सीबीआय विरुद्ध सीबीआय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करत अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. वर्मा यांनी याला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, यावर आज थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.

दरम्यान या प्रकरणी दिग्गज वकील आमने-सामने येणार आहे. आलोक वर्मा यांच्यावतीने फली नरीमन, सरकारकडून के.के.वेणुगोपाल, केंद्रीय दक्षता आयोगाकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, राकेश अस्थाना यांच्या वतीने मुकुल रोहतगी आणि कॉमन क्लॉज एनजीओकडून दुष्यंत दवे बाजू मांडणार आहे.

नवनियुक्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासाठी हे प्रकरण मोठे प्रकरण मोठे आहे.