अखेर आलोकनाथ यांच्यावर गुन्हा दाखल

0

मुंबई – मोहिमेने बॉलीवूडमध्ये अक्षरश: थैमान घातले आहे. दररोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहे. बॉलीवूडचे संस्कारी बाबू म्हणून ओळख असलेले अभिनेते आलोकनाथ यांच्यावर देखील बलात्काराचे आरोप करण्यात आले. अखेर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षांपूर्वी आलोकनाथ यांनी बलात्कार केल्याचा आरोप विनिता नंदा यांनी केला होता. याप्रकरणी काल ओशिवरा पोलिसांनी त्यांच्याविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र अद्यापपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

आलोकनाथ यांच्याविरोधात नंदा यांनी ८ ऑक्टोबरला एक लेखी तक्रारपत्र ओशिवरा पोलिसांना दिले होते. त्या तक्रारीची शाहनिशा केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल,असे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले होते. जबरी आणि अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी भादवी ३७६(१) आणि ३७७ ही कलमे त्यांच्यावर लावण्यात आली आहेत.