नवी दिल्ली: आम आदमी पार्टीने आज लोकसभा निवडणुक २०१९ करीता दिल्लीसाठी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. आम आदमी पार्टीने यावेळी पूर्ण राज्याच्या मुद्द्याला अग्रक्रम दिला आहे. जाहीरनाम्यातून हे दिसून आले. जाहीरनाम्यातून आपने अनेक आश्वासने दिली आहे, मात्र ही आश्वासने सशर्थ आहेत.
याबाबींचा समावेश
-दिल्ली पूर्ण राज्य बनला तर ८५ टक्के मुलांना महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल
-पोलिसांना लोकांप्रती accountable बनवणार, त्यामुळे महिला सुरक्षित राहतील
-पूर्ण राज्य बनले तर MCD सरकारच्या अंतर्गत येईल त्यामुळे दिल्ली अधिकच स्वच्छ होईल
-एका आठवड्यात दिल्लीतील अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल
-दिल्लीतील प्रत्येक मतदारांना स्वस्त आणि किफायतशीर घरे मिळतील –
-एंटी करप्शन ब्रांच दिल्ली सरकार अंतर्गत येईल त्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल
-पूर्ण राज्य बनले तर लोकपाल बिल पास होईल
अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत मोदींवर निशाना साधला. हे निवडणूक संविधान बचावासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मोदी पुन्हा निवडून आले तर संविधान धोक्यात येईल अशी टीका केजरीवाल यांनी केली. भाजप सोडून इतर कोणताही पक्ष सरकार बनवेल त्यांना आमचा पाठींबा राहील असे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.