पराभवाच्या चिंतनासाठी आपची बैठक !

0

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आपची सत्ता असतांना लोकसभेत एकही उमेदवार निवडून न आल्याचे पराभवाच्या चिंतनासाठी आज पक्षाची बैठक बोलविली आहे. पंजाबी बाग क्लब येथे होत असलेल्या या बैठकीत लोकसभा निवडणूकीत पार्टीला मिळालेल्या अपयशाच्या कारणांची मिमांसा केली जाणार आहे. तसेच, दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणूकांसाठी योजना आखली जाणार आहे.

या लोकसभा निवडणूकीत आम आदमी पार्टीची कामगिरी अतिशय वाईट झाली. पार्टीचे एकमेव खासदार भगवंत मान हेच केवळ आपली जागा राखू शकले. सातही जागांवर पार्टीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीत ‘आप’ला केवळ १८ टक्के मते मिळाली. भाजपाला ५६ टक्के व काँग्रेसला २३ टक्के मत मिळाली. ‘आप’च्या दिलीप पांडे, पंकज गुप्ता व ब्रजेश गोयल या उमेदवारांना डीपॉझीट देखील वाचविता आली नाही.

पंजाब व दिल्ली व्यतिरिक्त पार्टीने हरियाणामध्ये देखील उमेदवार उभे केले होते. मात्र, तिथेही कोणताही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. आता पक्षाने आपले संपूर्ण लक्ष आगामी विधासभा निवडणुकांवर केंद्रीत केले आहे.