हैद्राबाद-आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आंध्रप्रदेशच्या विभाजनच्या निषेधार्थ २०१४ किरण कुमार रेड्डी यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला होता. आज त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.
निवडणूक काळात भाजपने विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र चार वर्षे पूर्ण होऊन देखील अद्याप याबाबत काहीही उपाययोजना केलेल्या नाही. आश्वासन पूर्ण केले नाही तर भाजपवरील विश्वास कमी होईल असे कुमार रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.