आंध्रात माओवाद्यांकडून आजी-माजी आमदारांची हत्या

0

हैदराबाद – आंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. माओवाद्यांकडून या दोन्ही आमदारांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशाखापट्टनम येथील अराकू प्रदेशात या आमदारांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने आंध्र प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.