‘आप’ला धक्का; या आमदाराने केला भाजपात प्रवेश !

0

नवी दिल्ली: दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार देविंदर सेरावत यांनी आज भाजपात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थिती त्यांनी भाजपात प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वी आपचे एका आमदाराने भाजपात प्रवेश केला होता, आता पुन्हा एका आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने आपला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राफेल घोटाळ्यातून मोदींनी बक्कल पैसा कमविला असून त्यातून ते आमदार विकत घेत आहे असे आरोप केजरीवाल यांनी केले आहे.