आपचे आमदार कपिल मिश्रा भाजपच्या वाटेवर

0

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे माजी मंत्री व आमदार कपिल मिश्रा लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री विजय गोयल मिश्रा यांना भेटायला त्यांच्या घरी गेल्यामुळे या बातमीला दुजोरा मिळाला आहे.

भाजप नेते गोयल यांनी माध्यमांसमोर सांगितले, की भाजपचे दरवाजे नेहमी उघडे आहेत. आता कपिल मिश्रा ठरवतील की त्यांना भाजपला पाठिंबा द्यायचा आहे की नाही. चांगल्या लोकांनी भाजपला पठिंबा द्यावा अशी आपली इच्छा असल्याचेही गोयल यांनी सांगितले. भाजपच्या संपर्क फॉर सहयोग अभियाना अंतर्गत विजय गोयल मिश्रांना भेटायला गेले होते. यादरम्यान गोयल यांनी मिश्रा यांना मोदी सरकारच्या ४ वर्षांच्या कामगिरीची माहिती दिली.

कपिल मिश्रा यांना आपमधून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर मिश्रा व आपचे संबंध बिघडले. मिश्रा यांनी आम आदमी पक्ष व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले होते.