आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाचे कार्य समाजाला दिलासा देणारे – एकनाथ खडसे

भुसावळ प्रतिनिधी l

येथील वांजोळा रोड वरील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाच्या रौष्य महोत्सवी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रसंगी अध्यक्षीय भाषणात काळानुसार समाजाच्या गरजा ओळखून विविध उपक्रम सातत्याने वाचनालय आयोजित करत असते. त्यांचे कार्य समाजाला दिलासा देणारे आहे यशवंत गुणवंत विद्यार्थी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांचेही समायोजित भाषण झाले सौ रजनी सावकारे एडवोकेट रोहिणी ताई यांनी वाचनालय राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे म्हणून माझी खासदार डॉक्टर उल्हासराव पाटील रोहिणी ताई खडसे प्रतिष्ठा महिला महामंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे सौभारती ठाकूर माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे उमेश नेवाडे पिंटू ठाकूर प्रमोद नेमाडे टीव्ही पाटील प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे विनिता नेवे दिनेश

 

नेमाडे प्रमोद सरोदे श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दहावीतून ९७.१७ गुण प्राप्त केलेली निलश्री वाणी हीने मनोगत व्यक्त केले. तर ८१ विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. वाचनालयाचे आजीवन सदस्य संचालक यांचाही सन्मान करण्यात आला. यांना पुरस्कार प्रदान…..

 

सुहास गोपाळ चौधरी (समाज भूषण) राजेंद्र भानुदास फेगडे (लेवा रत्न) रामचंद्र पांडुरंग ढाके (सेवा रत्न) गणेश भागवत पाटील (साने गुरुजी स्मृती शिक्षक गौरव पुरस्कार) सुरेश नारायण शिंदे (साने गुरुजी स्मृती मुख्याध्यापक गौरव पुरस्कार) असे सन्मानपत्र, शाल, हार श्रीफळ, शिरोभूषण स्मृतीचिन्ह असे पुरस्कार यांचे स्वरूप होते.

प्रास्ताविक वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष प्रमोद सरोदे अजय वाघोदे सतीश ढाके ,रितेश वाणी दिलीप भारंबे लक्ष्मण पाटील आदींनी केले तर प्राध्यापक घनश्याम सरोदे, प्राध्यापक सचिन कुंभार, प्राध्यापक अजित चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कॉमेड मॅरेथॉन मध्ये यश प्राप्त केलेले अस्थिरोग तज्ञ डॉ. तुषार पाटील, डॉ. चारुलता पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय कथक नृत्यांगडा प्रचिती कुलकर्णी यांनी गणेश वंदना व सरस्वती वंदना उत्कृष्ट सादर केली नगर पालिकेचे नूतन मुख्याधिकारी महेश वाघतोडे उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्याचे आधी पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नामदेव ढाके यांनी वाचनालयाचे उपक्रम जाणून घेत सहकार्य करण्याचे जाहीर केले. कार्यक्रमास परिवारातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे कार्यक्रमाची सांगता झाली. वाचनालयाच्या मोकळ्या जागेस फ्लेवर ब्लॉक बसवून व स्वच्छतागृह तसेच मुलांसाठी खेळणी दिले जातील असे आवाहन माजी मंत्र महसूल एकनाथराव खडसे यांनी जाहीर केले.