आसाराम बापूंचा पॅरोलसाठी अर्ज

0

जोधपूर – आश्रमातील शिष्येवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूचे तुरुंगातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असून त्याने राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग यांच्याजवळ एक याचिका दाखल केली आहे. तसेच अर्ज देखील आहे.

आपल्याच आश्रमातील मुलीसोबत दुष्कर्म केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू मागील ५ वर्षापासून कोठडीत आहे. बाहेर येण्यासाठी आसाराम बापू शिक्षा झाल्यापासूनच प्रयत्न करत आहे.

आसाराम बापूला २०१३मध्ये जोधपूरला आणले होते. तेंव्हापासून तो तुरुंगात बंद आहे. शिक्षा होण्याच्या पूर्वीपासूनच त्याने न्यायालयामध्ये अनेक वेळा जामीनावर बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने पॅरोलवर बाहेर येण्याची विनंती केली आहे. त्याचे वय ७० वर्षाच्या जवळपासअसून या वयात पॅरोल मिळण्याचा हक्क आरोपीला असतो.