आसारामच बापूच्या अब्जावधी संपत्तीचे काय?

0

जोधपूर-अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा झाली असून त्याचा मुलगा नारायण साईदेखील सुमारे चार वर्षांपासून तुरुंगात आहे. जेलबाहेर देशभरातील त्याचे 400 आश्रम आणि अब्जावधींची संपत्ती अजूनही कायम आहे. ही संपत्ती कोण सांभाळत असेल असा प्रश्न जनसामान्यांना आहे. आता आसाराम बापूंची संपत्ती त्याची मुलगी भारती सांभाळत आहे.

आता हे संपूर्ण नेटवर्क भारतीच्याच हाती आहे. आसारामच्या अटकेननंतर वडिलांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत आहे. ‘संत श्री आसारामजी ट्रस्ट’ची धर्मादाय संस्था म्हणून नोंद आहे. याचं मुख्यालय अहमदाबादमध्ये आहे. इथेच आसारामने पहिल्या आश्रमाची स्थापना केली होती. देशातील सर्वच राज्यात पसरलेले आश्रम भारतीच सांभाळत आहे.