एबी डिव्हीलियर्सने अचानक केली निवृत्तीची घोषण

0

नवी दिल्ली-दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हीलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधून अचानक निवृत्ती स्विकारली आहे. ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत डिव्हीलियर्सने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. ज्या मैदानावर डिव्हीलियर्सने पहिल्यांदा क्रिकेट सामना खेळला त्या टच क्रिकेट क्लबच्या मैदानावरुव व्हिडीओ शेअर करत डिव्हीलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.

आतापर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये मी खेळलो आहे, त्यामुळे यापुढच्या काळात तरुण खेळाडूंना संधी मिळणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी ज्या प्रकारे क्रिकेट सामने खेळतो आहे, त्यामुळे मला आता थकायला झालं आहे असं म्हणत डिव्हीलियर्सने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.