जळगांव जिल्ह्यात जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची रावेर तालुक्यातील अभोळा बु., केऱ्हाळा, रावेर, रसलपूर, मंगळूर, मोहगण ई. ठिकाणी, खासदार रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी
भुसावळ प्रतिनिधी l दि.०८ जून २०२३ रोजी जळगांव जिल्ह्यात जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची रावेर तालुक्यातील अभोळा बु., केऱ्हाळा, रावेर, रसलपूर, मंगळूर, मोहगण ई. शेती शिवारात खासदार रक्षाताई खडसे यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच तत्काळ पंचनामे करून पुढील कार्यवाही करणे बाबत संबंधितांना सूचना केल्या.
जोरदार पाऊस व जोरदार वादळामुळे रावेर तालुक्यातील उभ्या पिकांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊन अनेक शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरुपूर प्रयत्न करणार असल्याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना खासदार रक्षाताई खडसे यांनी आश्वासन देऊन धिर दिला.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह सुरेश धनके, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सुनिल पाटील, माजी पं.स.सदस्य पी.के.महाजन, संदीप सावळे, महेश पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, उमाकांत महाजन, रावेर तहसिलदार कापसे, तालुका कृषी अधिकारी वाळके, मंडळ अधिकारी मयूर भारंबे, अरुण इंगळे, काळे, कृषी सहाय्यक असीम तडवी, सावळे,राजपूत तसेच स्थानिक ग्रामस्थ समाधान सावळे, सुरेश सुरवाडे, उमाकांत महाजन, सुधाकर निंबाळकर, अशोक धनके, निलेश नाईक, लक्ष्मण मोपारी, कैलास पारधी, नारायण महाजन, सुनिल महाजन, शेख अयुब, शेख असलम, .
लीलाधर महाजन, कैमुर तडवी, यासीन तडवी, सुलतान तडवी ई. उपस्थित होते.