एरंडोल मध्ये जप्त केला गेला तब्बल १५०० किलो गांजा

एरंडोल – समस्त जळगाव जिल्हाची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, मुंबई एनसीबी पथकाने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथून तब्बल १,५०० किलो गांजा जप्त केला आहे.

एनसीबीच्या पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल१,५०० किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी धाड टाकून गांजाची पोती ताब्यात घेतली आहेत.