अबू आझमी यांचा बंडखोरी दम

0

लखनऊ- समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबु आसिम आझमी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी समाजवादी पक्षाने जर कॉंग्रेसशी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत युती केले तर मी पक्षाच्या विरोधात जाईल अशी धमकी वजा बंडखोरी दम दिली आहे. अखिलेश यादव यांना कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसने स्टार प्रचारक म्हणून नियुक्त केले असल्याने ते नाराज झाले आहे. कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसने सपाला जागा दिल्या नाहीत तरी देखील आपण प्रचारक म्हणून का जाणार आहात असा प्रश्न त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये २१ आमदार असलेल्या कॉंग्रेसला आपण १०५ जागा दिली मात्र कॉंग्रेसकडून सपाला जागा दिली जात नसल्याचे त्यांनी पत्रात सांगितलेले आहे.