जळगाव : पोलीस ठाण्यात जप्त केलेले वाळूचे ट्रक सोडण्यासाठी एक लाख पंचवीस हजारांची लाचेची मागणी करुन खाजगी पंटरमार्फत ती स्वीकारणाऱ्या जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला जयपाल चौरे वय ३६ रा. सागरपार्क समोर शासकीय निवासस्थान यांच्यासह त्यांच्या लिपिक अतुल अरुण सानप वय ३२ रा. मेहरुण या दोघांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे . जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शुक्रवारी २१ रोजी दुपारी पथकाने ही कारवाई केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उप अधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस कॉन्स्टेबल अशोक अहिरे, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपासा पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहे.