पोलिसांना हिसका देऊन शहादा न्यायालयातून सिने स्टाईलने आरोपी फोर व्हीलर मधून फरार
शहादा |
शहादा न्यायालयात आरोपीला आज दुपारच्या सत्रात हजर करण्यासाठी आणले असता पोलिसांना आरोपीने हिसका देऊन फोर व्हीलर गाडीत बसून फरार झाला.पूर्वनियोजित प्लॅन आखून फोर व्हीलर गाडी कोर्ट आवारात उभी केली होती.
आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटून पोलिसाला हिसका देऊन गाडीच्या दिशेने आरोपी भरदाव वेगाने गेला.तोपर्यंत गाडी चालक पळण्याचा उद्देशाने गाडी सुरू करून ठेवली होती.चालत्या गाडीत आरोपी बसला व गाडी सुसाट वेगाने चित्रपट मधील एखाद्या सिन प्रमाणे कोर्ट मधून डोंगरगाव रोडाकडे निघाली.क्षणाचाही विचार न करता पोलीस कर्मचारी गाडी मागे धावला परंतु गाडी एवढ्या सुसाट वेगाने सुटली की क्षणात नजरेआड झाली.
नंतर समजले की थोड्या अंतरावर त्या गाडीने एका दुचाकी स्वारास उडविले.त्यास जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
अद्यापपर्यंत आरोपीचे नाव समजू शकले नाही. फरार होण्यासाठी ज्या गाडीचा वापर केला त्या गाडीला नंबर प्लेट नसल्याने गाडी कुठली कोणाची समजू शकले नाही.