फैजपुरात प्लास्टिक कॅरीबॅग विक्रेत्यांवर कारवाईने खळबळ

0
फैजपूर- प्लॅस्टीक कॅरीबॅगवर शासनाने बंदी आणली असलीतरी शहरातील काही विक्रेते सर्रास कॅरीबॅग विक्री करीत असलने बुधवारी पालिकेच्या कर्मचार्‍यांनी सकाळी विक्रेत्यांकडॅन कॅरीबॅग जप्त करून सात हजार 500 रुपयांचा दंड वसुल केला. या कारवाईने विक्रेत्यांमध्ये खडबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्यात 50 मॅयक्रोन पेक्षा कमी कॅरीबॅग सर्रास सुरू असल्याने पर्यावरणावर याचा परीणाम जाणवत होता. कॅरीबॅग बंदीचा निर्णय राज्य सरकाने गुढीपाडव्यापासून लागू केल्यानंतर मोठ्या शहरात निर्णयाची अंमलबजावणी लागू झाली मात्र फैजपूर शहरात सर्रास कॅरीबॅग विक्री होत असल्याने बुधवारी पालिकेने मोहिम आखत कारवाई केली.