अभिनेता आयुष्यमान खुराणाच्या पत्नीला कॅन्सर

0

नवी दिल्ली-बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि इरफान खान गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत असल्याची बातमी काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप हिला देखील कॅन्सर असल्याचे निदान झाले.

ताहिराने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत आपल्या आजाराची माहिती दिली. स्टेज ० ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याचे तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे.

माझ्यासारख्या अनेक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागृती निर्माण करण्यासाठी मी ही पोस्ट लिहिली असल्याचे ताहिराने म्हटले आहे. ‘किम कर्दाशियनला टक्कर देण्याची संधी माझ्या हातून निसटली. मला एक पुरस्कार मिळणार असल्याचे मी एक आठवड्यांपूर्वी सांगितले होते. मी तेव्हाही खूश होत, आत्ताही आनंदी आहे. याचमुळे मी ही पोस्ट लिहिले आते. मी स्वत:वर प्रेम करते आणि परमेश्वराचे आभार मानू इच्छिते. माझ्या या पोस्टसोबतचा फोटो तुम्हाला विचलित करू शकतो. पण एका व्याथीने मला जडले आहे. मला झीरो स्टेज ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. सर्व वयाच्या मुलींना ब्रेस्ट कॅन्सरबद्दल कळावे, असे मला वाटते,’ असे ताहिराने लिहिले आहे.