अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे निधन !

0

नवी दिल्ली: सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने ७८ व्या वर्षी निधन झाले. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. दिनयार यांनी अनेक चित्रपटांत काम केले. बाजीगर, ३६ चायना टाऊन, खिलाडी, बादशाह अशा अनेक चित्रपटांत ते दिसले. अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. दिनयार यांनी थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गुजराती आणि हिंदी नाटकांमध्ये त्यांनी काम केले. याचवर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.