अभिनेता नसीरुद्दीन शाह वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत !

0

चंदीगड: ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शाह वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडले आहे. नसीरुद्दीन शाहने मी आपल्या मुलांच्या बाबतीत चिंतीत आहे. समाजात विष पसरविले जात आहे. कोणी जमाव येऊन माझ्या मुलांना ‘तू हिंदू आहेस की मुस्लिम’? असा प्रश्न विचारतील अशी भीती असल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे नसीरुद्दीन शाह वादात सापडले आहे.

नसीरुद्दीन शाह यांनी बुलंदशहरमधील कथित गो-हत्येच्या संशयावरून एका पोलीस अधिकाऱ्याची करण्यात आलेल्या हत्येचा हवाला देत हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी ट्वीटकरत नसीरुद्दीन शाह यांना काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे.