Drunk and Drive: अभिनेता प्रतिक बब्बर यांचा रक्त तपासणीला नकार

0

पणजी: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेता राज बब्बर यांचे चिरंजीव प्रतिक बब्बर यांच्यावर गोवा पोलिसांनी मद्य सेवन करून वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची रक्तचाचणी करण्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र प्रतिक बब्बर यांनी रक्त चाचणी करण्यास नकार दिला. पोरवोरिम पोलिस ठाण्याचे निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले की, मापूसा शहरातील असिलो हॉस्पिटलमध्ये बब्बर यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले तेव्हा त्यांनी त्याचे रक्त नमुना देण्यास नकार दिला.

मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला गेला होता. दरम्यान अभिनेता प्रतिक बब्बरवर आयपीसीच्या कलमांखालीही गुन्हा दाखल करता येईल का?याबाबत पोलीस प्रशासन तपास करीत आहे. अभिनेता राज बब्बर आणि स्वर्गीय स्मिता पाटील यांचे पुत्र प्रतीक बब्बर यांनी “जान तू या जान ना”, “धोबी घाट”, “दुम मारो दुम” आणि “माय फ्रेंड पिंटो” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.