अभिनेता प्रतीक बब्बर चढणार बोहल्यावर !

0

लखनौ-बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा माहोल आहे. रणवीर-दीपिका, प्रियांका-निक यांचा लग्न नुकतीच पार पडला आहे. दरम्यान आता अभिनेता प्रतीक बब्बर लवकरच गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्न करणार आहे. वर्षभरापूर्वी २२ जानेवारीला प्रतीक व सान्याचा साखरपुडा झाला होता. यानंतर बरोबर वर्षभरानी म्हणजेच येत्या २२ व २३ जानेवारीला प्रतीक व सान्या विवाहबद्ध होत आहेत. लखनौत हा विवाह सोहळा होणार आहे.

गेल्या आठ वर्षांपासून सान्या व प्रतीक एकमेकांना ओळखतात. पण गत दोन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सान्या ही मूळची लखनौची आहे. सान्या ही पेशाने रायटर, डायरेक्टर व एडिटर आहे. एका राजकीय नेत्याची मुलगी असलेली सान्या साखरपुड्याच्या सहा महिन्यांपूर्वीच लंडनहून पोस्ट गॅज्युएशन करून परतली

प्रतीकने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’, दम मारो दम’, ‘एक दिवाना था’, आरक्षण’, ‘मुल्क’ या चित्रपटांत प्रतीकने काम केले आहे.