गुड न्यूज: ऋषी कपूर झाले कॅन्सरमुक्त !

0

नवी दिल्ली:बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर गेल्या सात महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. पण आता निर्माते राहुल रावैल यांनी सोशल मीडियाद्वारे ऋषी कपूर कर्करोगमुक्त झाले असल्याचे त्यांच्या फॅन्सना सांगितले आहे. राहुल यांनी फेसबुकवर नुकताच ऋषी कपूर यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत ऋषी कपूर (चिंटू) कर्कमुक्त झाले असल्याचे म्हटले आहे.

ऋषी कपूर हे कोणत्या आजाराच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले याबद्दल कपूर कुटुंबियांनी मौन राखणेच पसंत केले होते. पण आता राहुल रावैल यांच्या फेसबुक पोस्टवरून ऋषी कपूर कर्करोगाच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले होते हे कळून येत आहे. आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तसेच ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांनी अमेरिकेला जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्यांची पत्नी नीतू सिंग गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांच्यासोबतच आहे.