मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमित पुरोहितचे अकाली निधन झाले आहे. अमित पुरोहितच्या निधनाने बॉलिवूड जगतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमित पुरोहितने २०१८ मध्ये अभिनेत्री अदितीराव हैदरीसोबत सुपटहिट ‘संम्मोहन’ या चित्रपटातून भूमिका साकारली होती. अमित पुरोहित, अदितीराव हैदरीसोबत असलेल्या नात्यामुळेही चर्चेत होता. अमित पुरोहित यांचे सहकलाकार सुधिर बाबु यांनी १० जुलै रोजी अमितच्या निधनाची माहिती दिली. २०१८ मध्ये आदिती राव हैदरी याने ‘समोहनम’ हे तेलगु चित्रपट केले होते, यात अमित पुरोहित यांनी अदिती राव हैदरीच्या प्रियकराची भूमिका निभावली होती.