लखनौ: बॉलिवूडमधील आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यावर फसवणूकप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका स्टेज शोसाठी पैसे घेऊनही शो केला नसल्याचा तिच्यावर आरोप आहे. उत्तर प्रदेशातील काटघर पोलीस ठाण्यात सोनाक्षीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तीने एका स्टेज शोसाठी आयोजकांकडून २४ लाख रुपये घेतले होते मात्र, कार्यक्रम केला नव्हता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनाक्षीला ताब्यात घेण्यासाठी काल उत्तर प्रदेश पोलीस सोनाक्षीच्या मुंबईतील घरी पोहोचले, मात्र ती घरी नव्हती. फसवणूक केल्याप्रकरणी तिच्यावर भादंवि कलम ४२० आणि ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.