नेरी- भटक्या विमुक्त जमातीत समाविष्ट असलेला तिरमल समाज हा मूळ तिरुमला देवस्थानचा मूळ जमातीतील असून महाराष्ट्रात त्यांना भटक्या जमातीत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे तिरमल समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी रविवारी पार पडलेल्या राज्यस्तरीय मेळाव्याद्वारे करण्यात आली. जळगाव औरंगाबाद महामार्गावरील सूनसगावशेजारी असलेल्या भवानी फाटा येथे भव्य प्रागणात करण्यात आले होते.
देशभरातून उपस्थिती
यावेळी आमदार सुरेश भोले, जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, माजी जी.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, माजी कुलसचिव अशोक महाजन, भटके विमुक्त हक्क परिषदेचे धनंजय ओंबासे, प्रतीक गोसावी, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश या राज्यातूनही समाज बांधव जळगाव येथे दाखल झाले होते. यावेळी समाजाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
आमदार भोळे यांनी समाजाच्या मागण्या मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन यांनी यावेळी दिले. या मेळाव्यात समाजातील शासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी, गुणवन्त विद्यार्थी, समाजसेवक यांचा गौरव करण्यात आला.