आधार-पॅन कार्ड लिंकिंगला मुदतवाढ !

0

मुंबई: अर्थ मंत्रालयाकडून आधार आणि पॅन कार्ड जोडण्यासाठी 30 सप्टेंबर मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत वाढविण्याचा निर्णय सरकाने घेतला आहे. 31 डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्याला कोणत्याही कारणास्तव पॅनशी आधार जोडणे शक्य झाले नसेल तर आता जोडता येणार आहे.

आयकर विभागाने पॅनशी आधार जोडणे बंधनकारक केले आहे. तसेच 31 डिसेंबरपर्यंत न जोडल्यास आपले पॅनकार्ड 1 जानेवारी 2020 पासून निष्क्रिय करण्यात येणार आहे. पॅन आणि आधार क्रमांक आयकर विभागाच्या संकेतस्थळावरुन किंवा एसएमएसच्या सहाय्याने लिंक करता येणार आहे. मात्र, हे क्रमांक जोडताना नाव आणि जन्मतारीख चुकीची असणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.