मुंबई – राज्यामध्ये २४ मे ते ७ जून हा रोहिणी नक्षत्राचा कालावधी ‘उन्नत शेती- समृद्ध शेतकरी’ पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कृषी व कृषी संलग्न विभागामार्फत हा पंधरवाडा साजरा करण्यात यावा, अशा सूचना राज्याच्या कृषी विभागाने दिल्या आहेत.
हे देखील वाचा
रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत प्रत्येक गावामध्ये खरीप हंगामपूर्व तयारीच्या बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी या पंधरवाड्यामध्ये कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संशोधन संस्था, महसूल, पंचायत समिती, पशूसंवर्धन, वनविभाग, बँकाचे अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे.
या पंधरवाड्यामध्ये कृषी व कृषी सलंग्न विभागाचे तंत्रज्ञान व योजनांची माहिती शेतकऱ्यांनी देण्यात योणार आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधूनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दलही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ हा तंत्रज्ञान प्रचार व प्रसार पंधरवाडा आयोजनाची जबाबदारी ही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक यांच्याकडे देण्यात आली आहे.