काबुल- अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात आज झालेल्या बॉम्बस्फोटात किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ६ लहान मुलांचाही समावेश आहे. अफगाणिस्तानमध्ये संसदीय निवडणुकांच्या दुसऱ्या दिवशी हा बॉम्बस्फोट झाला.
अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. यापूर्वी शनिवारी झालेल्या हिंसेमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे निवडणूक लांबली होती. त्यामुळे रविवारी शेकडो मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत जवळपास 30 लाख नागरिकांनी दहशतवाद्यांच्या धमकीला न घाबरता मतदान केल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 401 मतदान केंद्र खुले असणार आहेत.