अफगाणिस्तानने बदलला कर्णधार

0

अफगाणिस्तान : वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाच्या नेतृत्वात खांदेपालट केले आहे. संघाचे नेतृत्व आता फिरकीपटू रशीद खानकडे सोपवण्यात आले असून तो तीनही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेत संघाचे नेतृत्त्व करणार आहे. असगर अफगान हा उप कर्णधाराच्या भूमिकेत असेल. वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानला एकही सामना जिंकता आला नव्हता.

वर्ल्ड कपच्या आधी नैबकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. पण, त्याने संघाची कामगिरी सुधारली नाही. त्यांना एकही विजय मिळवता आला नाही. वर्ल्ड कपपूर्वी अफगानकडे संघाचे नेतृत्व होते, परंतु त्यालाही साजेशी कामगिरी करता आली नव्हती. वर्ल्ड कपमध्येही असगरने 26च्या सरासरीनं 154 धावा केल्या. दुसरीकडे नैबने 21.55 च्या सरासरीनं 194 धावा केल्या. शिवाय गोलंदाजीत त्याने 9 विकेट घेतल्या.