काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात १४ जण ठार

0

अफगाणिस्तान :- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १४ जण ठार झाले असून यात ७ धर्मगुरू आणि ४ सुरक्षा कर्मचारी आहे तर इतर तिघांची ओळख पटलेली नाही. दोन हजाराहून जास्त मौलवी आणि धर्मगुरू दहशतवादाविरोधात आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या बैठकीत सहभागी झाले होते.

या हल्ल्यामधील मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून या हल्ल्यात १७ जण जखमी असल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्याबाबतची माहिती अद्यापही समजू शकलेली नाही. या बैठकीत अफगाण उलेमा कौन्सिल सरकारच्या सैन्यदलाला आणि तालिबान व इतर दहशतवाद्यांना हे युद्ध थांबवण्याची आणि शस्त्रसंधीबाबत सहमती बनवण्याचे अपील करण्यात आले. दोन्ही पक्षांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.