मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. येत्या १५ दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात २ मोठे बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, येत्या १५ दिवसानंतर महाराष्ट्रात तसेच देशात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने हे मोठे बॉम्बस्फोट असतील. नेमके काय घडेल हे मी आत्ताच सांगणार नाही, मात्र १५ दिवसानंतर आपण भेटू, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल.
एकीकडे गुन्हेगारांना कायद्याने आळा घालायचा नाही आणि दुसरीकडे त्यांना गोळ्या घालण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकारची बंडखोरी अगोदर पासून सुरू आहे. पूर्वी डकेतील समाज नव्हता, आता तो आपला समाजाचा नाही म्हणून त्यांना मारायचे, हाच प्रकार सुरू आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.