४० वर्षानंतर शहादा समितीत सत्तांतर ; नवापूरात काँग्रेसच्या आ. नाईकांची सत्ता
पालकमंत्री गावितांचे पॅनल पराभूत चंद्रकांत रघुवंशी यांनी मारली बाजी
नंदुरबार प्रतिनिधी
१८ जागा जिंकत रघुवंशी गटाने एकतर्फी विजय मिळविला आहे.
जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, नवापूर बाजार समितींचा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. त्यात पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित पुरस्कृत पॅनलचा तिनही ठिकाणी दारुण पराभव झाला. तसेच शहादा बाजार समितीत ४० वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. येथे अभिजित पाटील यांच्या पॅनलने बाजी मारली आहे.
नंदुरबार बाजार समिती ही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाकडे होती. ती त्यांनी कायम राखली आहे. याठिकाणी १८ पैकी १४ जागा जिंकत त्यांनी सत्ता काबीज | केली आहे. शहादा बाजार समितीत मात्र परिवर्तन घडले आहे. ही बाजार समिती गेल्या ४० वर्षापासून स्व. पी. के. अण्णा पाटील यांच्या गटाकडे होती. मात्र, येथे आता त्यांचे पारंपरिक विरोधक जि.प.चे माजी सभापती अभिजित पाटील यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. १८ पैकी १४ जागा त्यांनी जिंकल्या असून दीपक पुरुषोत्तम पाटील गटाला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.