जिल्हा बँकेत नाट्यमय सत्तांतरानंतर तहकूब झालेली सभा लागली मार्गी
सभेला विरोधी सदस्यांच्या उपस्थितीबाबत होती शंका
जळगाव प्रतिनिधी l गेल्या महिन्यात जिल्हा बँक चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदी निवड प्रक्रिया पार पडली. बात राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी ऐन वेळेस चेअरमन अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली. यामुळे अध्यक्षपदासाठी संजय पवार आणि भैय्या पाटील यांच्या लगत झाली. यात पवार यांनी एक मताने बाजी मारून सत्ता संपादन केली तर अमोल चिमणराव पाटील हे उपाध्यक्षपदी बिनविरोध विराजमान झाले.
संजय पवार यांच्या निर्णयाचा राष्ट्रवादीला वर का सला. यामुळे जिल्हा बँकेत सत्तांतर झाल्यानंतर ऐकणाठराव केली होती. तर पवार यांनीदेखील याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यानंतर गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेची सभा आयोजीत करण्यात आली. या सभेला विरोधी पक्षाचे सदस्य उपस्थित राहिले नाही. परिणामी कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करावी लागली. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने इतर संचालकांना फोन कॉल केल्यामुळे विरोधक उपस्थित राहिले बसला. यामुळे जिल्हा बँकेत सत्तांतर झाल्यानंतर एकनाथराव नाहीत, असा आरोप संजय पवार यांनी केला होता. खडसे यांनी अतिशय कडक शब्दांमध्ये त्यांच्यावर टीका दरम्यान, हीच तहकूब झालेली सभा आज दुपारी २ वाजता आयोजीत करण्यात आली. या सभेला विरोधी सदस्य उपस्थित राहतील की नाही? याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला होता.
तथापि, स्वतः आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह माजी अध्यक्ष गुलाबराव देवकर, अनिल भाईदास पाटील, रोहिणी खडसे आदींसह अन्य संचालक बँकेच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने नवीन चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या उपस्थितीत पहिली सभा मार्गी लागली आहे.