लखनौ-अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सध्या देशभरात चर्चेत आहे. सरकार कधी अध्यादेश काढणार याबाबत उत्सुकता आहे. लवकर मंदिराचे बांधकाम सुरु करावे अशी मागणी होत आहे. दरम्यान सरकार राम मंदिरासंबंधीचा कायदा आणू शकते अशीही चर्चा होत आहे. या सर्व घडामोडींमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराबाबत एक मोठे विधान केले आहे. दिवाळीनंतर राम मंदिर निर्माणाचे काम सुरू होऊ शकते असे संकेत त्यांनी दिले आहेत.
‘ या दिवाळीला यंदा एक दिवा प्रभू रामचंद्राच्या नावाने पेटवा, तेथे काम लवकरच सुरू होईन. आपल्याला दिवाळीनंतर हे काम करायचे आहे’ असे ते म्हणाले. यंदा अयोध्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्साहात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. यंदा जवळपास 3 लाख दिवे पेटवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.