एक्झिट पोलचा अंदाज पाहताच शेअर मार्केटमध्ये उसळी !

0

नवी दिल्ली: विविध माध्यमांनी काल रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर केले. दरम्यान एक्झिट पोल झाल्यानंतर, अपेक्षेनुसार आज सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने उसळी घेतल्याचे दिसून आले. सेन्सेक्समध्ये ९०० रूपयांची वाढ तर निफ्टीतही २०० रूपयांनी तेजी आल्याचे दिसून आले. शिवाय रूपया देखील ७३ पैशांनी मजबूत झाला आहे.

सोमवारी सकाळी सेन्सेक्स ८८८.९१ अंकांच्या वाढीसह ३८,८१९.६८ अंकांवर तर निफ्टी २८४.१५ अंकांच्या वाढीसह ११,६९१.३० अंकांवर उघडला. रविवारी लोकसभा निवडणूक मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा पार पडल्यानंतर विविध माध्यमांनी दर्शवलेल्या एक्झिट पोल प्रमाणे केंद्रातील सत्ता पुन्हा ‘एनडीए’ कडे जाणार असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम आज शेअर बाजारावरही दिसून आला. केंद्रात स्थिर सरकार येण्याची चिन्हे दिसता असल्याचे पाहून, शेअर बाजारात उत्साह दिसून येत आहे.