भारतीय बाजारातून ५६०० हजार कोटींची गुंतवणूक घेतली मागे

0

नवी दिल्ली- सातत्याने रुपयात होणारी घसरण आणि कच्च्या तेलाचे वाढते दर यामुळे विदेश गुंतवणूकदरांचा भारतीय शेअर बाजारावरील विश्वास कमी होत आहे. याचाच परिणाम म्हणून मागील पाच व्यापारी सत्रात भारतीय बाजारातून ५ हजार ६०० करोड रुपयाची गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे. मागील दोन महिन्यापासून गुंतवणूक कमी होत आहे.

डिपॉजिटरीच्या ताजी आकडेवारीनुसार फॉरेन पोर्टफोलियो इन्वेस्टर्स (FPIs) ने सप्टेंबर महिन्यात इक्विटीमध्ये 1,021 करोड़ रुपए आणि डेट मार्केटमधील 4,628 करोड रुपये काढण्यात आले आहे. एकंदरीत बघता सप्टेंबरमध्ये 5,649 करोड रुपये बाजारातून काढण्यात आले आहे.