लोकसभा निकालानंतर कॉंग्रेस पक्षात राजीनामा सत्र सुरु

0

नवी दिल्ली: काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेस पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु असतांनाच कॉंग्रेसचे उत्तर प्रदेश मधील प्रभारी राज बब्बर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सोपवला आहे. तसेच ओडिशा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निकालानंतर कॉंग्रेसपक्षात राजीनामा सत्र सुरु झाल्याने वरिष्ठ नेत्यांचे धाबे दणाणले आहे.

लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी नरेंद्र मोदी यांना कौल देत सत्तेवर बसवले आहे. देशातल्या सगळ्यात मोठे असलेले राज्य उत्तरप्रदेशात कॉंग्रेसला फक्त एकाच जागेवर विजय मिळाला आहे.

ज्या राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे त्या राज्यात कॉंग्रेसला साधा भोपळा सुद्धा फोडता आला नाही. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे स्वतः कॉंग्रेसचा किल्ला असणारा अमेठी या मतदार संघातून पराभूत झाले आहे, तसेच उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर हे सुद्धा फतेहपुर सिक्री मधुन पराभूत झाले असून देशात कॉंग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे कॉंग्रेस मध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे.