तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी माघारीअंती चार पॅनल रिंगणात

शहादा, l तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी माघारीअंती चार पॅनल रिंगणात आहेत. त्यामुळे पहिल्यांदा चौरंगी लढत होणार असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. चारही पॅनल प्रमुखांकडून ग्रामीण भागांत विविध सभा व बैठका होत असल्याने उशिरा रात्रीपर्यंत कमालीची वर्दळ वाढली आहे. भाजपाचे खा हिना गावित, आ विजयकुमार गावित यांचा एक गट तर भाजपा चे तळोदा मतदारसंघाचे आ राजेश पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटी यांचा दुसरा गट तर भाजपाचे माजी जिप उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, माजी जिप कृषी सभापती अभिजित पाटील हे तीन गट एकमेकांशी झुंज देणार असुन यात महविकास आघाडी ने या निवडणुकीत आपले उमेदवार दिल्या जिल्ह्यातील नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे .

बाजार समितीच्या निवडणुकीत माघारी अंती 65 उमेदवार रिंगणात आहे. मात्र लोकशाही आघाडीचे पॅनल वगळता अन्य तीन पॅनलला सर्व जागांवर उमेदवार मिळू शकले नाही. त्यामुळे शेतकरी विकास पॅनेलने काही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. तर पालक मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनाही सर्व जागांसाठी उमेदवार मिळू शकले नाही.

सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडी पॅनलमध्ये त्यांचे सुपुत्र मयूर दीपक पाटील, माजी सभापती सुनील सखाराम पाटील, माजी उपसभापती रवींद्र रावल, मंदाणे येथील माजी उपसरपंच अनिल भामरे या प्रमुख उमेदवारांच्या समावेश आहे. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलमधून स्वतः अभिजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुरेश नाईक, शेल्टी येथील माजी सरपंच शिवाजी पाटील या प्रमुख उमेदवारांच्या समावेश आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे किसान परिवर्तन पॅनल मधून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती डॉ. भगवान पाटील, ईश्वर भुता पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांचे बंधू भरत पाटील या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. तर शिवसेनेचे उपसंपर्क प्रमुख (ऊबाठा गट) अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पॅनलमध्ये गणेश रघुनाथ पाटील, सागर चौधरी, सुरेश पटले, विलास पावरा या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. चौरंगी लढतीमुळे शहादा तालुक्यातील राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे.