अकबरुद्दीन ओवेसी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

0

हैदराबाद : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे नेहमी वादग्रस्त विधानांमुळे ओळखले जातात. आज त्यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. मी केलेले १५ मिनिटांचे वक्तव्य अनेकांच्या जिव्हारी लागले होते. त्यामुळे माझा इतका द्वेष केला जातो, असे त्यांनी करीमनगर येथील सभेत सांगितले.

आपल्या २०१३ च्या सभेत त्यांनी आम्ही २५ कोटी आहोत, आणि तुम्ही हिंदू १०० कोटी आहेत. फक्त पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा, मग कोणामध्ये किती दम आहे हे दिसेल,” असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी या वक्तव्यावरून खूप वाद झाला होता. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, हे जग त्याच व्यक्तीला घाबरवते जो घाबरतो. मात्र जग त्या व्यक्तीला घाबरते जो घाबरवणे जाणतो असेही ते यावेळी म्हणाले.

मुस्लीम समाजाने शूर व्हावे, जेणेकरून त्यांचायासमोर कुठला चहावाला उभा राहू शकणार नाही. तरुणांना सांगेन की आम्ही येथे जे काही करतो त्याच्या बदल्यात आपल्याला जन्नत किंवा जहन्नूम मिळते. मात्र शहीद जन्नतींच्या जन्नतीमध्ये जातात. त्यामुळे तरुणांनो तुमच्यासमोर कुठलीही घोषणाबाजी झाली तरी तुम्ही केवळ अल्लाचे नाव घ्या,’ असे आवाहन ओवेसी यांनी केले.