अबूधाबी- संयुक्त अरब अमीरात(यूएई) आणि भारत या दोन्ही देशात व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंध वाढविण्यासाठी मुद्रा विनिमय संबंधी करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. अबूधाबीमध्ये भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. दोन्ही देशात द्विपक्षीय मुद्रा विनिमय संमतीमुळे भारत आणि यूएई दरम्यान अमेरिकी डॉलरसारख्या तिसऱ्या मानक मुद्रावर कमी प्रमाणात आधारित राहावे लागेल.
अबूधाबीमध्ये यूएई-भारत संयुक्त बैठकीच्या १२ व्या सत्रातील मंत्रीस्तरीय बैठक झाली त्यात हा निर्णय झाला.