शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत ; पावसानंतर पेरणीला येणार वेग
जळगाव (अतुल कोठावदे) : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकरी आपले शेत तयार करण्याच्या लगबगीत आहे. शेतात खत टाकून नांगरून, वखरून तयार केले आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर पेरणीला सुरुवात होणार आहे. बाजारात बियाणे दाखल झाले आहे मात्र शेतकर्यांकडून मागणी नसून खरेदीचा थंड प्रतिसाद आहे. पहिल्या पावसानंतर बियाणे खरेदीला वेग येणार असल्याचे चित्र आहे.
बागाईतदार शेतकर्यांनी जे काही कापसाचे बियाणे खरेदी केले आहे त्या मध्ये राशी 659, आतिश, निओ, सुपर कॉट या जातीच्या कापसाला मागणी केली आहे. पाऊस पडल्यानंतर कृषीबाजारात नवचैतन्य पाहण्यास मिळते. तसेच कोरड वाहू जाती मध्ये राशी 659, बोलगार्ड, अजित 155, अंकुर 651, भक्ती, विठ्ठला, ब्रम्हा पारस, या कापसाच्या जातीना शेतकरी वर्गाकडून चांगली मागणी असते असे व्यापार्यांनी सांगितले. बाजारात बियाण्याचे दर कमी अधिक होत राहतात. मागणीनुसार किंवा खरेदीला वेग आल्यावर दरांवर परिणाम होतो.
केवळ 20 टक्के बियाणाची विक्री
गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी कृषी बाजारात कापसाच्या बियाण्याची आवक मोठ्या प्रमाणता झाली. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे यंदा दुष्काळ आहे, विहिरीही आटल्या असल्योन पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कृषि विभागाने धूळ पेरणी करु नका, पाऊस पडल्यावरच पेरणी करा, असे आवाहन केले असल्याने त्यामुळे पाऊस पडेपर्यंत शेतकरी बियाणे खरेदीकडे वळणार नाही. गेल्या वर्षीच्या में महिन्यात कापूस लागवड 40 ते 50 टक्के झाली होती, व बाजारात बियाण्याला बर्या प्रमाणात मागणी होती. मात्र गतवर्षी गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता, यंदा रोखण्यासाठी कृषि विभागाने केलेल्या जनजागृतीला शेतकरी देखील प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागणी कमी असल्याने आतापर्यंत फक्त 20 टक्के बियाण्यांची विक्री झाली आहे.
यंदा कापूस लागवडीचे क्षेत्रात वाढ
गेल्या वर्षी 2018-19 मध्ये 4 लाख 91 हजार 609 हेक्टरावर कापसाची लागवड झाली होती. त्यात यंदा वाढ होणार असून 5 लाख 10 हजार 911 हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा वाढणार