शहादा,दि.30
तालुका खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज दि.1 जुलै रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालय, शहादा (जि.नंदूरबार) व शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 1 जूलै 2023 रोजी ‘कृषि दिना’ निमित्त शेतकरी मेळावा सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या शेतकरी मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक के.रविसाहेब कार्यालय प्रमुख अडास्का, अशोक साकळे उपव्यवस्थापक इफको हे राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, चेअरमन खरेदी विक्री संघ शहादा हे राहतील. या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती खरेदी विक्री संघाचे मॅनेजर अनिल पाटील व
डॉ.प्रकाश पटेल प्राचार्य कृषि महाविद्यालय शहादा यांनी केली आहे.