अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचा निकाल ९८.९३ टक्के
प्रथम योगिता राजेश पाटील तर मागासवर्गीयांमध्ये प्रथम मानसी किशोर अहिरे
शाळेची परंपरा उज्वल यशाची
भुसावळ l
दि 2 जून रोजी इंटरनेट वरून लागलेल्या येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल 98.93% इतका लागला असून शाळेतून 92.40% मिळवून प्रथम योगिता राजेश पाटील, 91.20% मिळवून व्दितीय समिक्षा नितीन पांगळे , 90.60% मिळवून तृतीय कोमल दत्तात्रय लोखंडे तर 90% मिळवून चतुर्थ भावना सुभाष चौधरी तर मागासवर्गीयांमध्ये 88.20% गुण मिळवत मानसी किशोर अहिरे ही प्रथम आली आहे .
शाळेतून एकूण 188 विद्यार्थिनी परीक्षेला बसलेले होते यापैकी 65 विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह ,107 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत, 11विद्यार्थिनी द्वितीय श्रेणीत ,3विद्यार्थिनी तृतीय श्रेणीत पास झालेल्या आहेत .
अहिल्यादेवी कन्या विद्यालयाची निकालाची उज्वल परंपरा यावर्षीही विद्यार्थिनींनी राखली .
श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे पालक बापूराव मांडे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे सचिव श्रीमती उषाताई पाटील संचालक श्रीधर खणके तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी पर्यवेक्षक संजीव पाटील व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडूनही सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले .