अहिल्यादेवी कन्या विद्यालयात योगा दिन साजरा

भुसावळ

येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे सकाळ सत्रात जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने योग दिन साजरी करण्यात आला सकाळच्या सूत्रात सुमारे 450 विद्यार्थिनींनी योगाचा अनुभव घेतला यामध्ये सूर्यनमस्कार, विविध योगासने, प्राणायाम, सूक्ष्म हालचाली व मेडिटेशन घेण्यात आले योगाचे मार्गदर्शन श्री काशीराम बारेला व क्रीडा शिक्षिका वंदना ठोके यांनीही मार्गदर्शन केले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मानसि कुलकर्णी यांनी योगाचे महत्त्व सांगून सर्वांनी आरोग्यासाठी योगा करणे आवश्यक आहे.

हे यावेळी सांगितले शाळेचे पर्यवेक्षक संजीव पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग योगाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनीही योगा कार्यक्रमात सहभागी घेतला .