अहिल्यादेवी कन्या विद्यालय विद्यार्थिनी दिन मोठ्या उत्साहात साजरा

विद्यार्थिनींनी साकारल्या शिपाई ते शिक्षिका सर्व भूमिका

हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन

खाद्यानांचे विविध स्टॉल

भुसावळ येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनी दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला .यामध्ये सकाळी सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष महेंद्र मांडे उर्फ सोनू मांडे यांनी विद्यार्थिनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी मुख्याध्यापिका पियुशा महाजन व विद्यार्थिनी पर्यवेक्षिका ऋचा भारंबे उपस्थित होते या हस्तकलेत विविध स्वरूपाचे वॉल हैंगिंग इतर अनेक वस्तू टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करून त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते यानंतर दुपार सत्रात सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्तआहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला विद्यार्थिनी मुख्याध्यापिका पियुशा महाजन व पर्यवेक्षिका ऋचा भारंबे यांच्या हस्ते पूजन व माल्या अर्पण करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी व पर्यवेक्षक संजीव पाटील सर उपस्थित होते .त्यानंतर वर्गात विद्यार्थिनी गेल्यावर शाळेचे संपूर्ण कामकाज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांभाळले यामध्ये मुख्याध्यापिका पर्यवेक्षिका क्लर्क शिपाई ही सगळी काम विद्यार्थ्यांनी केली . ज्या विद्यार्थिनी शिक्षिका बनला होत्या त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या विद्यार्थिनींना शिकविले आणि विद्यार्थिनी ही त्यांना योग्य प्रतिसाद देत प्रश्न उत्तरांची चर्चा केली यावेळी वर्गातील वातावरण अतिशय शांत शिस्तप्रिय दिसून आले .विविध चर्चेमध्ये ही विद्यार्थिनी सहभाग घेतला त्यानंतर मधल्या सुट्टीत खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले यामध्ये कचोरी समोसा पॅटीस मंचुरियन पराठे दाबेली वडापाव असे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले होते विद्यार्थीनी या ठिकाणी जाऊन ते पदार्थ खरेदी करून मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला . 

यावेळी अतिशय उत्साहाचा वातावरण पाहायला मिळाले यानंतर त्या तासिका झाल्यानंतर विद्यार्थिनी एकत्र करत दिवसभरातील कार्यक्रमाचे अनुभव कथन घेण्यात आले यामध्ये शिक्षिका बनलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे अनुभव विद्यार्थ्यांचे अनुभव आणि विद्यार्थ्यांचे अनुभव घेण्यात आले अतिशय बोलक्या स्वरूपातले अनुभव यावेळी विद्यार्थ्यांनी मांडले .

अशा या कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना व्यवहारात ज्ञान विद्यार्थी मधील कलागुणांना वाव विद्यार्थी मित्र गुण कौशल्य हे ओळखण्यासाठी असे उपक्रम फार महत्त्वाचे आहेत असे उपक्रम सर्व ठिकाणी व्हावे जेणेकरून विद्यार्थिनींना आम्हाला जीवन जगण्याचा अर्थ यामधून समजत असतो आम्ही बनवलेल्या काही वस्तूंना काही पालकांनी तसेच इतर मान्यवरांनी ही वस्तू विक्रीच्या बाबत विचारणा केली म्हणजे या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला स्वयंरोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकतो हे या निमित्ताने पाहायला मिळाले असे विद्यार्थिनी मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर आमच्याच बरोबरच्या विद्यार्थिनी आम्हाला शिकवायला आल्यात आणि योग्य प्रकारे शिकवलं हे आम्ही न विसरण्यासारखे आहे .असे विद्यार्थीनी मत व्यक्त केले .यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी विद्यार्थिनी हा दिवस विद्यार्थी दिवस अतिशय उत्कृष्ट्या वाखाणण्याजोग्या साजरी केला अतिशय शिस्तबद्धपणे शांतपणे आपण साजरी केला आपणाला खूप खूप धन्यवाद देते व असंच आपण वर्षभर सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करते .कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बंधूंनी ही मोठ्या प्रमाणात सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला .