नाशिकमध्ये वायुदलाचे विमान कोसळले!

0

नाशिक : नाशिकमध्ये आज सकाळीच वायुदलाचे सुखोई विमान कोसळून अपघातग्रस्त झाले आहे. सुदैवाने वैमानिक सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत जवळच्या वावी ठुशी गावचे शिवारात वायुदलाचे लढाऊ सुखोई विमान दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळलं. त्यात विमान जळून खाक झाले आहे. तर विमानाच्या दोन पायलटने उडी मारल्याने ते बचावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.