एयरपोर्टवर चहा-नाश्ता स्वस्त

0

नवी दिल्ली- एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने प्रवाश्यांसाठी नवीन सेवा सुरु केली आहे. या सेवेमुळे आता एयरपोर्टवर प्रवाश्यांना चहा आणि नास्ता स्वस्त मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र वेगळे काउंटर सुरु केले जाणार आहे. एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानुसार ही सुविधा सरकारकडून सुरु केली जाणार आहे.

हवाई प्रवाश्यांची संख्या वाढली
भारतात मागील तीन ते चार वर्षात मोठ्या प्रमाणात हवाई प्रवाश्यांच्या संख्येत २०-२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नागरिक उड्डयन मंत्रालयच्या आकडेवारीनुसार जुलै, में १ कोटी १६ लाख प्रवाश्यांनी हवाई सफर केले आहे. जुलै २०१७ च्या तुलनेत ही वाढ २१ टक्के आहे.

संसदेत यासाठी अनेक खासदारांनी मुद्दा मंडल आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरमयांनी चहा-नाश्ताच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.