सिनेमा तिकीटावरील जीएसटी कमी केल्याने अजय देवगणने मानले मोदींचे आभार

0

नवी दिल्ली-काल जीएसटी कौन्सीलच्या बैठकीत अनेक वस्तूंवरील वस्तू व सेवाकर (जीएसटी) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात सिनेमाच्या तिकीटावरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. १०० रुपयांवरील सिनेमाच्या तिकिटावरील जीएसटी २८ वरून १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. सरकारने सिनेमा तिकीटावरील जीएसटी कमी केल्याने अभिनेते अजय देवगण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.

मागील आठवड्यात सिनेसृष्टीच्या शिष्टमंडळाने मोदींची भेट घेऊन तिकीटावरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली होती.

संबंधित बातमी-मनोरंजन उद्योगावरील जीएसटी कमी करा; सेलेब्रिटींनी घेतली मोदींची भेट